नागपूर : दोन वाघांमध्ये झालेल्या भीषण लढाईत एका वाघाचा मृत्यू

Nagpur News: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील दक्षिण उमरेड वनक्षेत्रातून एका वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन वाघांमधील रक्तरंजित लढाईत एका वाघाचा मृत्यू झाला आहे. अशी माहीत समोर आली आहे. ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडली …

नागपूर : दोन वाघांमध्ये झालेल्या भीषण लढाईत एका वाघाचा मृत्यू

Nagpur News: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील दक्षिण उमरेड वनक्षेत्रातून एका वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन वाघांमधील रक्तरंजित लढाईत एका वाघाचा मृत्यू झाला आहे. अशी माहीत समोर आली आहे. ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडली असावी, अशी भीती वन विभागाने व्यक्त केली आहे.

ALSO READ: ५ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या, हातपाय तोडून मृतदेह शेतात फेकून दिला

मिळालेल्या माहितनुसार, वाघाच्या शरीराची तपासणी केली असता, त्याचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले, परंतु शरीराचा मधला भाग मांसाहारी प्राण्यांनी खाल्लेला दिसून आला. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, लढाईनंतर वाघाचा मृत्यू झाला आणि त्याचे शरीर काही वन्य प्राण्यांनी खाल्ले असावे.

माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. 

ALSO READ: विरोधी नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून निषेध

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: दिल्ली मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शाळा शुल्क कायद्याला मंजुरी

Go to Source