खानापूर तालुक्यात वाळू उपसा सुरू करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन
नंदगड : खानापूर तालुक्यात वाळू उपसा करण्याची परवानगी द्यावी, याबाबतचे निवेदन ब्लॉक काँग्रेसच्यावतीने सोमवारी तहसीलदारांना देण्यात आले. खानापूर तालुक्यात यापूर्वी वाळू उपसा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु अलीकडे वाळू उपसा करण्यासाठी अनेक नियम घालण्यात आले आहेत. त्यामुळे वाळू उपसा करणे पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे लहान शेतकरी व गरिबांना वाळू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे घर बांधण्यासाठी वाळू नसल्याने घरांची कामे अर्धवट राहिली आहेत. वाळूवर आधारित कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. वाळू बंद झाल्यामुळे वाळू संबंधित अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यासाठी लवकरात लवकर वाळू उपसा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, मधुकर कवळेकर, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अनिता दंडगल, प्रमोद सुतार, प्रसाद पाटील, सुरेश जाधव, वैष्णवी पाटील, सावित्री मादार, बाबू हत्तरवाड, सुनील हंजी आदींसह अनेक कार्यकर्ते व वाळू व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी खानापूर तालुक्यात वाळू उपसा सुरू करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन
खानापूर तालुक्यात वाळू उपसा सुरू करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन
नंदगड : खानापूर तालुक्यात वाळू उपसा करण्याची परवानगी द्यावी, याबाबतचे निवेदन ब्लॉक काँग्रेसच्यावतीने सोमवारी तहसीलदारांना देण्यात आले. खानापूर तालुक्यात यापूर्वी वाळू उपसा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु अलीकडे वाळू उपसा करण्यासाठी अनेक नियम घालण्यात आले आहेत. त्यामुळे वाळू उपसा करणे पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे लहान शेतकरी व गरिबांना वाळू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे […]
