अनगोळ येथील समस्या सोडविण्यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन

बेळगाव : अनगोळ येथे ड्रेनेज पाईप लाईनसाठी खोदाई करण्यात आली आहे. अजूनही हे काम अर्धवट आहे. धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथपेठपर्यंतचे काम अर्धवट असून ते पूर्ण करावे. अनगोळ शेवटच्या बसथांब्यापर्यंत बस सोडावी, चिदंबरनगर येथील स्मशानभूमीमधील पाण्याची समस्या दूर करावी, या मागण्यांसाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. गेल्या तीन ते चार […]

अनगोळ येथील समस्या सोडविण्यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन

बेळगाव : अनगोळ येथे ड्रेनेज पाईप लाईनसाठी खोदाई करण्यात आली आहे. अजूनही हे काम अर्धवट आहे. धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथपेठपर्यंतचे काम अर्धवट असून ते पूर्ण करावे. अनगोळ शेवटच्या बसथांब्यापर्यंत बस सोडावी, चिदंबरनगर येथील स्मशानभूमीमधील पाण्याची समस्या दूर करावी, या मागण्यांसाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अनगोळमधील ड्रेनेज व रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून त्यामुळे येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेज पाईप लाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. मात्र अजूनही ते काम अर्धवटच आहे. चिदंबरनगर येथील स्मशानभूमीमध्ये पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन करताना समस्या निर्माण होत आहेत.
शेवटच्या बसथांब्यापर्यंत बस सोडा
या स्मशानभूमीमध्ये पाण्याची समस्या असून तेथील कूपनलिका दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर शेडचीही दुरुस्ती करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे अनगोळला सोडण्यात येणाऱ्या बसेस मराठी शाळेजवळच थांबत आहेत. त्यामुळे अनगोळातून चालत तिथपर्यंत विद्यार्थी, महिला व वृद्धांना यावे लागत आहे. त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा शेवटच्या बसथांब्यापर्यंत बस सोडावी, अशी मागणी केएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.