विकासकामे राबविण्यासंदर्भात वड्डेबैल ग्रामस्थांच्यावतीने निवेदन
खानापूर : तालुक्यातील चापगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील वड्डेबैल या गावात गेल्या कित्येक वर्षापासून विकासकामे राबविण्यात आलेली नाहीत. गावातील रस्ते, गटारी करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या काही वर्षापासून वड्डेबैल गावाला कोणताच विकासनिधी देण्यात आलेला नाही. रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या निधीतील विकासकामेही राबविण्यात आलेली नाहीत. यासाठी ग्रामस्थांनी तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देवून विकासकामे राबविण्यात यावीत, अशी मागणी केली. तालुका कार्यनिर्वाहक अधिकारी भाग्यश्री जहागीरदार यांनी निवेदनाचा स्वीकार करून पीडीओंच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. वड्डेबैल गाव हे चापगाव ग्रा. पं. क्षेत्रात येत असून या गावच्या विकासासाठी कोणताच निधी देण्यात आलेला नाही. मागील दोन वर्षापूर्वी उद्योग खात्री आणि रोजगार हमी योजनेतून निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र एका स्थानिक नेत्याच्या हस्तक्षेपामुळे कंत्राटदारांनी या कामातून काढता पाय घेतला आहे. याबाबत तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी उद्योग खात्री योजनेतून मंजूर झालेल्या निधीची विकासकामे तातडीने सुरू करण्यात यावीत, याबाबत कंत्राटदाराला अभय देवून कामाची सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर समस्त वड्डेबैल ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
Home महत्वाची बातमी विकासकामे राबविण्यासंदर्भात वड्डेबैल ग्रामस्थांच्यावतीने निवेदन
विकासकामे राबविण्यासंदर्भात वड्डेबैल ग्रामस्थांच्यावतीने निवेदन
खानापूर : तालुक्यातील चापगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील वड्डेबैल या गावात गेल्या कित्येक वर्षापासून विकासकामे राबविण्यात आलेली नाहीत. गावातील रस्ते, गटारी करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या काही वर्षापासून वड्डेबैल गावाला कोणताच विकासनिधी देण्यात आलेला नाही. रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या निधीतील विकासकामेही राबविण्यात आलेली नाहीत. यासाठी ग्रामस्थांनी तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देवून विकासकामे राबविण्यात यावीत, अशी मागणी […]
