मार्च महिन्याच्या मध्यात बिगुल वाजण्याचे संकेत
13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार : सात ते आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया घेण्याचा आयोगाचा विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली असून आयोगाकडून कार्यक्रमाची रितसर आखणी करण्याचे नियोजन सुरू आहे. देशात मार्च-एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून 13 मार्चनंतर निवडणुकीची तारीख जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 7-8 टप्प्यात होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोग 13 मार्चनंतर कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. सध्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी अनेक राज्यांना भेटी देत आहेत. सर्व राज्यांमधील तयारीचा आढावा घेतल्यानंतर तारखांची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला भेट दिली जाणार आहे. सर्व राज्यांचे दौरे 13 मार्चपूर्वी पूर्ण होणार आहेत. तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आयोग गेल्या काही महिन्यांपासून सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) नियमित बैठका घेत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची निवड, समस्या क्षेत्रे, ईव्हीएमची सुविधा, सुरक्षा दलांची आवश्यकता, सीमेवरील तपासणी नाके, मतदान केंद्रांवरील सुविधा आदी बाबींचा आढावा घेतला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘एआय’चा वापर
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग यावषी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याची योजना आखत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक विभाग देखील तयार केला जाऊ शकतो. कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर आयोग कठोर कारवाई करेल. या माध्यमातून निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील चुकीचा आणि प्रक्षोभक मजकूर काढून टाकण्याचे काम जलदपणे केले जाईल. कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने नियमांचे उल्लंघन करत राहिल्यास, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खाती ब्लॉक करणे यासारखी कठोर कारवाई करण्यास आयोग सज्ज आहे.
एप्रिल-मे महिन्यात मतदान अपेक्षित
निवडणूक आयोगाने राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना 10 मार्चपर्यंत तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून विविध राज्यांचे आढावा दौरे पूर्ण झाल्यानंतर दिल्लीत सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान यावर्षीही एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्मयता आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीची तारीख 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत सात टप्प्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी झाली. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, अऊणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या होत्या.
Home महत्वाची बातमी मार्च महिन्याच्या मध्यात बिगुल वाजण्याचे संकेत
मार्च महिन्याच्या मध्यात बिगुल वाजण्याचे संकेत
13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार : सात ते आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया घेण्याचा आयोगाचा विचार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली असून आयोगाकडून कार्यक्रमाची रितसर आखणी करण्याचे नियोजन सुरू आहे. देशात मार्च-एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून 13 मार्चनंतर निवडणुकीची तारीख जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2024 […]