छोट्या व्यावसायिकांवर आपुलकीचे छत !

विशाल परब यांच्याकडून शिरोड्यात छत्र्यांचे वाटप छोट्याछोटया उद्योजक व व्यावसायिकांच्या पाठीशी राहण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने नेहमीच अवलंबलेले आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि कोकणचे नेते नारायणराव राणे यांच्या माध्यमातून कितीतरी नव-व्यावसायिकांना भाजपाने विविध योजनांचा लाभ दिला आहे. याच संकल्पनेवर भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार काम करताना दिसत आहेत. […]

छोट्या व्यावसायिकांवर आपुलकीचे छत !

विशाल परब यांच्याकडून शिरोड्यात छत्र्यांचे वाटप
छोट्याछोटया उद्योजक व व्यावसायिकांच्या पाठीशी राहण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने नेहमीच अवलंबलेले आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि कोकणचे नेते नारायणराव राणे यांच्या माध्यमातून कितीतरी नव-व्यावसायिकांना भाजपाने विविध योजनांचा लाभ दिला आहे. याच संकल्पनेवर भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार काम करताना दिसत आहेत.
आज त्यांच्या माध्यमातून शिरोडा बाजारपेठेतील भाजी, फळे, फुले विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.गाव व शहरातील बाजारपेठेमध्ये छोटे शेतकरी व्यवसायिक शेतामध्ये भाजी पिकवून, तसेच इतर जीवनावश्यक वस्तू आणून बाजारात मोकळ्या जागेत बसून विक्री करीत असतात. त्यांना नेहमीच कडक उन्हे आणि जोरदार पावसाचा त्रास सहन करावा लागत असतो. त्यांचा त्रास लक्षात घेऊन विशालभाई परब यांनी अनेक ठिकाणी या छोट्या व्यावसायिकांना मोठ्या छत्र्या देत त्यांना आपुलकीचा आधार दिलेला आहे. आज शिरोडा बाजारपेठेत अनेक छोट्या व्यावसायिकांना त्यांच्यामार्फत अशा छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विशालभाई परब यांच्यासह सागर राणे यूवा मोर्चा उपाअध्यक्ष मनोज उगवेकर ,मयुरेश शिरोडकर,लक्ष्मीकांत करपे,रामशिंग राणे ,जगन्नाथ राणेमहादेव नाईक,एकनाथ साळगांवकर ,अर्चना नाईक ,ज्ञानेश्वर केरकर ,ओंकार कोनाळकर,रूपेश बांदेकर ,महेश कोनाळकर,समीर कांबळी .मनोहर होडावडेकर.अनिल गावडे,बाळू वस्त आदी पदाधिकारी व शिरोडा भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.