कॅम्पमधील समस्यांचा आमदारांकडून आढावा

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक ठिकाणी विकासकामांची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी आमदार राजू सेठ यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. कॅम्प येथील फिश मार्केट, हिंडलगा गणपती रोड, सीईओ निवासस्थानासमोरील उद्यानाला भेट देऊन तेथे होणाऱ्या विकासकामांबाबत चर्चा केली ढजानेवारी महिन्यात झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीत विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये उद्यानांचा विकास केला जाणार आहे. […]

कॅम्पमधील समस्यांचा आमदारांकडून आढावा

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक ठिकाणी विकासकामांची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी आमदार राजू सेठ यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. कॅम्प येथील फिश मार्केट, हिंडलगा गणपती रोड, सीईओ निवासस्थानासमोरील उद्यानाला भेट देऊन तेथे होणाऱ्या विकासकामांबाबत चर्चा केली ढजानेवारी महिन्यात झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीत विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये उद्यानांचा विकास केला जाणार आहे. बोर्डने निधी मंजूर केल्याने या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर गांधी चौक ते हिंडलगा गणपतीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाबरोबरच रुंदीकरणाचाही विचार सुरू आहे. यासंदर्भात आमदार सेठ यांनी भेट देऊन माहिती घेतली. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार यांनी मंजूर झालेला निधी तसेच राबविल्या जाणाऱ्या विकासकामांची आमदारांना माहिती दिली.
स्वच्छता ठेवण्याबाबत गाळेधारकांना सूचना
फिश मार्केट येथे स्वच्छता ठेवण्याबाबत आमदारांनी गाळेधारकांना सूचना केल्या. त्याचबरोबर गाळेधारकांना येत असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी सतीश मन्नोळकर त्याचबरोबर इतर अधिकारी उपस्थित होते.
नामनिर्देशित सदस्याला डावलले
आमदार राजू सेठ यांनी कॅम्प परिसरातील समस्यांचा आढावा घेतला. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे एकमेव नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांना मात्र डावलण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ व इतर अधिकारी उपस्थित असताना नामनिर्देशित सदस्यांना या दौऱ्याबाबत माहिती का देण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.