पालघर मध्ये पोलीस हवालदाराची गळफास लावून आत्महत्या
पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात एका 26 वर्षीय पोलीस हवालदाराने राहत्या घरी गच्चीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस नियंत्रण कक्षात तैनात असलेले हवालदाराने आपल्या राहत्या घरी गच्चीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या हवालदाराने आत्महत्या का केली याचा कारणाचा शोध लावत आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हवालदाराचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. अपघाताची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मयतने हे टोकाचे पाऊल का घेतले पोलीस याचा शोध लावत आहे.
Edited by – Priya Dixit