कपड्यांच्या शोरूममध्ये गोळीबार करून पेट्रोल बॉम्ब फेकला, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर शहरात गांधी चौकात एका कपड्याच्या दुकानात अज्ञात हल्ल्लेखोरांनी पेट्रोलबॉम्ब फेकून गोळीबार केला. या घटनेत दुकानावर काम करणारा कार्तिक साखरकर जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. व्हिडीओ मध्ये हल्लेखोर कसे अपघात घडवत आहे हे दिसत आहे. घटनेनंतर जखमी कार्तिकला तातडीनं रुग्णालयात पाठविले. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मास्क आणि टोप्या घातलेले तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यापैकी एका हल्लेखोराने दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ एक एक करत दोन पेट्रोल बॉम्ब फेकले. आणि एका हल्लेखोराने दुकानात शिरून गोळीबार केला. पेट्रोल बॉम्ब मुळे दुकानाला आग लागली.
या संपूर्ण घटनेत दुकानाचा मलिक थोडक्यात बचावला. सुदैवाने दुकानातील इतर कर्मचारी सुखरूप आहे.
हा हल्ला दुकानाचे मालिक यांची हत्याच्या कट रचण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
वर्षभरापूर्वी देखील दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती.या बाबतीत पोलीस तक्रार करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.
Edited by – Priya Dixit