नोएडामध्ये एका व्यक्तीने 15 व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका व्यक्तीने 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. प्राथमिक तपासात समजले की, व्यक्ती फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता असे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी घडल्याचे …

नोएडामध्ये एका व्यक्तीने 15 व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका व्यक्तीने 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. प्राथमिक तपासात समजले की, व्यक्ती फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता असे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या मित्राने सांगितले की, तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने त्रस्त होता. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतव्यक्ती नोएडा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तो फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. त्याचे कुटुंब त्याच्यासोबत राहत नव्हते. आजूबाजूच्या लोकांकडून समजले की, घरगुती वादामुळे त्याचे कुटुंब त्याच्यासोबत बरेच दिवस राहत नव्हते. तसेच पोलिसांनी या घटनेची माहिती व्यक्तीच्या कुटुंबीयांना आणि पत्नीला दिली आहे. व पुढील तपास सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source