केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाला चोख उत्तर
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : उत्तर मतदारसंघात प्रचार
बेळगाव : केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाला आपले सरकार नमले नाही. नागरिकांच्या अपेक्षेनुसार गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जनतेचे हित साधले आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील खंजर गल्ली यासह विविध भागात प्रचार करून त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवार मृणाल हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 2014 मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. रासायनिक खतांचे दर वाढविण्यात आले आहेत. देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. यासाठी नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस पक्षच खरा देशभक्त आहे. देशासाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी या दोघा पंतप्रधानांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. भाजपकडून देशभक्तीचा धडा घेण्याची गरज नाही, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार रमेश कुडची, राजेंद्र कलघटगी, राजेंद्र हुलबत्ते, किरण पाटील, शीतल दळवी, विशाल कुडते, कलीम मुल्ला, नासीर पठाण आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाला चोख उत्तर
केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाला चोख उत्तर
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : उत्तर मतदारसंघात प्रचार बेळगाव : केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाला आपले सरकार नमले नाही. नागरिकांच्या अपेक्षेनुसार गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जनतेचे हित साधले आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील खंजर गल्ली यासह विविध भागात प्रचार करून त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवार […]