इंटर मिलानचा एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ रोम
सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंटर मिलान संघाने सॅलेरमिटेनाचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत गुणतक्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. या सामन्यामध्ये पूर्वार्धात इंटर मिलानने 3 गोल नोंदविले.
या विजयामुळे इंटर मिलॉन संघाने आघाडीचे स्थान मिळविले असून ज्युवेंटस दुसऱ्या स्थानावर असून या दोन संघामध्ये 10 गुणांचा फरक आहे. शुक्रवारच्या सामन्यात मार्कोस थुरमने 16 व्या मिनिटाला इंटर मिलानचे खाते उघडले. त्यानंतर 16 व्या मिनिटाला मार्टिनेझने इंटर मिलानचा दुसरा गोल केला. मध्यंतराला 5 मिनिटे बाकी असताना डमफ्रिजने इंटर मिलानचा तिसरा गोल केला. त्यानंतर मार्को अॅमेटोव्हिकने इंटर मिलानचा चौथा गोल खेळाच्या उत्तरार्धात केला.
Home महत्वाची बातमी इंटर मिलानचा एकतर्फी विजय
इंटर मिलानचा एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ रोम सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंटर मिलान संघाने सॅलेरमिटेनाचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत गुणतक्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. या सामन्यामध्ये पूर्वार्धात इंटर मिलानने 3 गोल नोंदविले. या विजयामुळे इंटर मिलॉन संघाने आघाडीचे स्थान मिळविले असून ज्युवेंटस दुसऱ्या स्थानावर असून या दोन संघामध्ये 10 गुणांचा फरक आहे. शुक्रवारच्या […]