भिवंडीत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, आरोपीला अटक
ठाण्यातील भिवंडीच्या न्यू आजाद नगर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी 28 वर्षाचा तरुण असून त्याने शेजारी राहणाऱ्या एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. नंतर त्याचे मुलीकडे येणेजाणे सुरु झाले. मुलीचे पालक बाहेर गेले असता आरोपी तिच्या घरी गेला आणि तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी लैंगिक संबंध स्थापित केले.हा प्रकार मे पासून 25 ऑगस्ट पर्यंत सुरु होता. नंतर मुलीने 26 ऑगस्टरोजी आरोपीला नकार दिल्यावर त्याने मुलीला मारहाण केली आणि तिला धमकावले.
मुलीने घरी हा प्रकार सांगितल्यावर पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited by – Priya Dixit