मायकल जॅक्सनचा बायोपिक येतोय
जगातील प्रसिद्ध डान्सरपैकी एक मायकल जॅक्सनचा बायोपिक ‘मायकल’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये त्याची भूमिका जाफर जॅक्सन साकारत आहे. जाफर हा मायकल जॅक्सनचा पुतण्या आहे. या बायोपिकमध्ये कोलमॅन डोमिंगो, निया लॉन्ग आणि माइल्स टेलर यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एंटोनी फुक्वा यांनी केले असून याची कहाणी जॉन लोगन यांनी दिली आहे. मायकल जॅक्सनच्या रुपात जाफर स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे. तो लोकांशी मायकल जॅक्सनप्रमाणे बोलत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
मायकल चित्रपट जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एकाच्या जीवनाच्या काही अनोळखी पैलूंना दाखविणार असल्याचा दावा दिग्दर्शक करत आहे. मायकल जॅक्सन इतका महान कलाकार कसा झाला, हे या चित्रपटात दाखविले जाणार आहे. मायकल हा चित्रपट 24 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Home महत्वाची बातमी मायकल जॅक्सनचा बायोपिक येतोय
मायकल जॅक्सनचा बायोपिक येतोय
जगातील प्रसिद्ध डान्सरपैकी एक मायकल जॅक्सनचा बायोपिक ‘मायकल’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये त्याची भूमिका जाफर जॅक्सन साकारत आहे. जाफर हा मायकल जॅक्सनचा पुतण्या आहे. या बायोपिकमध्ये कोलमॅन डोमिंगो, निया लॉन्ग आणि माइल्स टेलर यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एंटोनी फुक्वा यांनी केले असून याची कहाणी जॉन लोगन यांनी दिली […]

