मुंबईतील अंधेरी परिसरात 14 मजली इमारतीला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

मुंबईत एका 14 मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील रिया महल या इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. आगीत भाजल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच सीएमओने तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, अन्य तीन जण जखमी झाले आहे. तर जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. काही लोक जखमी होण्याचीही शक्यता आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

अग्निशमन दलाची वाहने, हायड्रंट, टर्नटेबल शिडी आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित आहे . ही आग एका निवासी फ्लॅटपर्यंत मर्यादित असून अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source