सुकूर येथे टँकरमध्ये सांडपाणी भरताना एकास अटक
पर्वरी : सुकूरमधील एका पंचायत सदस्याने पाण्याच्या टँकरमध्ये सांडपाणी भरत असल्याची तक्रार पर्वरी पोलिसांत केली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टँकर क्र. जीए-03,डब्ल्यू-0932 चा चालक महासाद शरीफ दफादर (32, पूर्व बंगाल, सध्या वास्तव्य पर्वरी) हा टँकरमध्ये सांडपाणी भरत असल्याचे दृष्टीस पडला. पोलिसांनी महासाद यास टँकरसह ताब्यात घेऊन 34 (व्ही) कलमाखाली अटक केली. त्याला आता दंड न्यायाधिकारी यांच्यासमोर हजर करणार, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिली. तिळारी कालव्याच्या दुऊस्तीचे काम सध्या चालू असून पर्वरी मतदारसंघात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. याचा परिणाम टँकरद्वारे सांडपाणी भरण्याचे काम टँकरवाले करीत आहेत ते नागरिकांच्या जीवाला धोकादायक आहे. या प्रकारांवर जलस्रोत खात्याचे नियंत्रण नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
Home महत्वाची बातमी सुकूर येथे टँकरमध्ये सांडपाणी भरताना एकास अटक
सुकूर येथे टँकरमध्ये सांडपाणी भरताना एकास अटक
पर्वरी : सुकूरमधील एका पंचायत सदस्याने पाण्याच्या टँकरमध्ये सांडपाणी भरत असल्याची तक्रार पर्वरी पोलिसांत केली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टँकर क्र. जीए-03,डब्ल्यू-0932 चा चालक महासाद शरीफ दफादर (32, पूर्व बंगाल, सध्या वास्तव्य पर्वरी) हा टँकरमध्ये सांडपाणी भरत असल्याचे दृष्टीस पडला. पोलिसांनी महासाद यास टँकरसह ताब्यात घेऊन 34 (व्ही) कलमाखाली अटक केली. त्याला […]