फोर्टरोडवर रात्री उशिरा तुरळक दगडफेकीनंतर धावपळ

बेळगाव : अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सारे शहर रामभक्तीत दंग असतानाच सोमवारी रात्री उशिरा फोर्टरोडवर घडलेल्या तुरळक दगडफेकीच्या प्रकारानंतर एकच धावपळ उडाली. या घटनेनंतर शहरात अफवांचे पीक आले आहे. रात्री 10.30 नंतर फोर्टरोड परिसरात दगडफेकीची घटना घडली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. या घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश दामन्नावर व त्यांचे […]

फोर्टरोडवर रात्री उशिरा तुरळक दगडफेकीनंतर धावपळ

बेळगाव : अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सारे शहर रामभक्तीत दंग असतानाच सोमवारी रात्री उशिरा फोर्टरोडवर घडलेल्या तुरळक दगडफेकीच्या प्रकारानंतर एकच धावपळ उडाली. या घटनेनंतर शहरात अफवांचे पीक आले आहे. रात्री 10.30 नंतर फोर्टरोड परिसरात दगडफेकीची घटना घडली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. या घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश दामन्नावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील नागरिकांनाही आपापल्या घरात जाण्यास सांगितले. रात्री फोर्टरोडसह संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कटीमनी आदी वरिष्ठ अधिकारी मध्यरात्रीपर्यंत शहरात फेरफटका मारत होते. दरबार गल्लीतही तुरळक दगडफेक झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यानंतर या परिसरातही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्याशी संपर्क साधला असता, शहरात कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही. या केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.