अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी शेतकऱ्याच्या शेतात मोठे भगदाड; चर्चांना उधान

येवला तालुक्यातील प्रमुख श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींच्या सानिध्यात वसलेल्या अंकाई या किल्ल्याच्या पायथ्याशी मनमाड बाजूच्या भागात राजू धीवर यांची शेती आहे.

अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी शेतकऱ्याच्या शेतात मोठे भगदाड; चर्चांना उधान

social media
येवला तालुक्यातील प्रमुख श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींच्या सानिध्यात वसलेल्या अंकाई या किल्ल्याच्या पायथ्याशी मनमाड बाजूच्या भागात राजू धीवर यांची शेती आहे.

सदरचे शेतकरी आपल्या शेतात मशागत करत असताना नांगराचा फाळ खोलवर गेल्यानंतर जमिनीमध्ये एक मोठा खड्डा आढळून आला. मात्र हा खड्डा रहस्यमयरित्या असल्याने मोठे भुयार असल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आले. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर या ठिकाणी राजा महाराजांच्या काळामध्ये अंकाई किल्ल्यावरून खाली येण्या-जाण्यासाठी भुयारी मार्ग असावा असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान सोशल मीडियावर गुप्तधन सापडल्याच्या चर्चेमुळे अनेक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मनमाड येथील तलाठी प्रतिंभा नागलवाद यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून पुरातत्त्व विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या पाहणीनंतर या रहस्यमय बोगद्याचे कोडे उलगडेल तोपर्यंत अनेक चर्चांना उधाण आल्यानंतर नागरिक या ठिकाणी आता मोठी गर्दी करत आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Go to Source