करंबळ-बेकवाड लक्ष्मीयात्रेला सहाव्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी

सोमवार असल्याने शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती, भाविकांत उत्साह वार्ताहर /नंदगड करंबळ येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रेला सहाव्या दिवशी सोमवारी भाविकांसह शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे आजही गर्दीचा महापूर सर्वत्र दिसून येत होता. सोमवारी या भागातील शेतकरी शेतातील कामे करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना फावला वेळ मिळाला आणि त्यांनी करंबळ तसेच बेकवाडच्या जत्रेला उपस्थिती दर्शवली व देवीचे दर्शन घेतले. […]

करंबळ-बेकवाड लक्ष्मीयात्रेला सहाव्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी

सोमवार असल्याने शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती, भाविकांत उत्साह
वार्ताहर /नंदगड
करंबळ येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रेला सहाव्या दिवशी सोमवारी भाविकांसह शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे आजही गर्दीचा महापूर सर्वत्र दिसून येत होता. सोमवारी या भागातील शेतकरी शेतातील कामे करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना फावला वेळ मिळाला आणि त्यांनी करंबळ तसेच बेकवाडच्या जत्रेला उपस्थिती दर्शवली व देवीचे दर्शन घेतले. बहुतेक भाविक आपल्या कुटुंबासह मुलाबाळांसह उपस्थित होते. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत एकसारखे भाविक ओळीने जाऊन देवीचे दर्शन घेताना दिसत होते. त्यांच्यात मोठी श्रद्धा व अपूर्व उत्साह दिसून येत होता. सायंकाळी उशिरा करंबळ येथे कुस्ती आखाडा झाला. रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. मंगळवार दि. 5 रोजी बेकवाड येथे कुस्ती आखाडा होणार आहे.
बेकवाड येथे यात्रेनिमित्त आज कुस्ती मैदान
बेकवाड (ता. खानापूर) येथील श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त मंगळवार दि. 5 रोजी दुपारी 3 वाजता भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यामध्ये शिवानंद दडी विरुद्ध किरण शिंदे, संजू इंगळगी विरुद्ध श्रीकांत सांगली, विनायक गुरव विरुद्ध दिलीप सांगली, पवन चिकदिनकोप विरुद्ध गजानन सांगली, हनुमंत गंदिगवाड विरुद्ध परशु सिंडीहटी, राजीव गंदिगवाड विरुद्ध रोहन सांगली, बरांग इंगळगी विरुद्ध परशु हरिहार, विजय चिमड विरुद्ध सिंधू सांगली यासह नियोजित 21 कुस्त्यांसह अन्य कुस्त्या होणार आहेत.