अनगोळ येथे भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत

बेळगाव : अनगोळ येथील श्री राम सेना हिंदुस्थान यांच्यावतीने दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाच्या इतिहासात प्रथमच लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे असलेली बैलगाडा पळविण्याची भव्य जंगी शर्यत गुरुवार दि. 11 ते रविवार दि. 14 एप्रिल रोजी श्री मरगाई देवी तलाव येथे आयोजन करण्यात आली आहे. सदर स्पर्धेतील  विजेत्यांना बेळगाव हिंद केसरी किताब व दुचाकींचे बक्षीस, लाखोंची […]

अनगोळ येथे भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत

बेळगाव : अनगोळ येथील श्री राम सेना हिंदुस्थान यांच्यावतीने दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाच्या इतिहासात प्रथमच लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे असलेली बैलगाडा पळविण्याची भव्य जंगी शर्यत गुरुवार दि. 11 ते रविवार दि. 14 एप्रिल रोजी श्री मरगाई देवी तलाव येथे आयोजन करण्यात आली आहे. सदर स्पर्धेतील  विजेत्यांना बेळगाव हिंद केसरी किताब व दुचाकींचे बक्षीस, लाखोंची बक्षिसे, दोन गटात  अनगोळ येथील  या शर्यतीसाठी बेळगाव मध्ये पहिल्यांदाच लाखोंची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. सदर स्पर्धा ही लहान गटासाठी दि. 11 व 12 एप्रिल तर मोठ्या गटासाठी दि 11 ते 14 सलग चार दिवस असणार आहे.  गुरुवारी सकाळी 8 वाजता शर्यतीला सुरवात होणार आहे. तर दररोज सकाळी ठीक 8 ते रात्री 9 पर्यंत शर्यत सुरू राहणार आहे.  मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बजाज पल्सर,  द्वितीय क्रमांक 75 हजार, 61 हजार, 51 हजार, 45 हजार, 35 हजार, 31 हजार, 27 हजार, 25 हजार, 24 हजार, 23 हजार, 22 हजार, 21 हजार, 20 हजार,  अशी अनुक्रमे एकूण 30 बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर लहान गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस दुचाकी, द्वितीय क्रमांकांसाठी 35 हजार, 30 हजार, 25 हजार, 20 हजार, 15 हजार, 14 हजार, 13 हजार, 12 हजार, 11 हजार, 10 हजार अशी अनुक्रमे पंचवीस बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच मोठ्या व लहान गटातील प्रत्येक विजेत्या बैलजोडीला आकर्षक चषक,  तर विजेत्या बैलजोडीला बेळगाव हिंद केसरी पुरस्कार देण्यात येणार आहे. दोन्ही गटातील 51 व्या क्रमांकासाठी 5,555 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
 शर्यतीसाठी खास आकर्षण
संपूर्ण बैलगाडी शर्यतीचे थेट प्रक्षेपण युट्यूब व टीव्ही वर दाखविण्यात येणार आहे. शर्यत मैदानात एलईडी क्रीनवर थेट प्रक्षेपण, भव्य मंडप, सायंकाळी वेळ झाल्यास  विद्युत रोषणाईत बैलजोडी जुंपण्यात प्राधान्य, संपूर्ण मैदान सीसीटीव्हीच्या, ड्रोनच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचे  थेट प्रक्षेपण टिपण्यात येईल.  प्रेक्षकांना व्यवस्थित शर्यत पाहण्यासाठी खास  गॅलरी व बाल्कणीची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रतील व कर्नाटकातील  नामवंत गाजलेल्या बैलांची हजेरी राहणार आहे. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात बेळगाव जिह्यात प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील नामवंत बैलजोड्या शर्यत प्रेमी नागरिकांना पहावयास मिळणार आहेत.