लैंगिक अत्याचार झाल्याने मुलीने संपविले जीवन,पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर च्या घारगाव येथे घडली आहे. या प्रकरणात मुलीने बदनामीच्या भीतीने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले आहे. या प्रकरणात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला

लैंगिक अत्याचार झाल्याने मुलीने संपविले जीवन,पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर च्या घारगाव येथे घडली आहे. या प्रकरणात मुलीने बदनामीच्या भीतीने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले आहे. या प्रकरणात पाच जणांच्या  विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी 29 फेब्रुवारी रोजी परीक्षेचे हॉल तिकीट आणायला शाळेत गेली होती. या वेळी आरोपीने तिला बळजबरी एका पानाच्या टपरीत नेले आणि तिच्या तोंडावर रुमाल बांधून तिचे हात बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या वेळी आरोपीला इतर चार जणांनी मदत केली. मुलीने घरी आल्यावर बदनामी होईल या भीतीपोटी विषारी औषधाचे प्राशन करून आत्महत्या केली. या बाबत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार संहिता कायदाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source