नोटा दामदुप्पट आमिषाने फसविणाऱ्या टोळीला अटक
काकती पोलिसांची कारवाई : दोन कार, 11 लाख जप्त : संशयित हुक्केरी, संकेश्वर, निडसोशीचे
बेळगाव : नोटा दुप्पट करण्याचे सांगून 25 लाखांना ठकविणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण हुक्केरी, संकेश्वर, निडसोशी येथील राहणारे असून त्यांच्याजवळून दोन कार व 11 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 18 डिसेंबर रोजी सिदगौडा बिरादार रा. गोकाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काकती पोलीस स्थानकात भादंवि 419, 420 कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काकतीचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी सहभागी असलेल्या एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे. आणखी चार जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फरारी आरोपी मुधोळ परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धाप्पा बिरादार व त्यांचे नातेवाईक गुरुराज बिरादार रा. जमखंडी, जि. बागलकोट यांना गाठून या सोनेरी टोळीतील गुन्हेगारांनी आमच्याकडे पैसा खूप आहे. 25 लाख द्या, त्याच्या बदल्यात 50 लाख रुपये परत करू, असे सांगून या दोघा जणांना 25 लाखांना गंडविले होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनग्याजवळ रस्त्यावर व्यवहार करण्यात आला होता. 25 लाख रुपये घेऊन या टोळीतील गुन्हेगार फरारी झाले होते. पोलिसांनी दीपा आवटगी, शिवानंद मठपती, अप्पय्या पुजारी, सुनील विभूती, सचिनकुमार आंबली, भरतेश अगसर, शशांक रावसाहेब दो•ण्णावर या सात जणांना अटक केली आहे. हे सर्व जण हुक्केरी, संकेश्वर व निडसोशी परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी नोटा दामदुप्पट आमिषाने फसविणाऱ्या टोळीला अटक
नोटा दामदुप्पट आमिषाने फसविणाऱ्या टोळीला अटक
काकती पोलिसांची कारवाई : दोन कार, 11 लाख जप्त : संशयित हुक्केरी, संकेश्वर, निडसोशीचे बेळगाव : नोटा दुप्पट करण्याचे सांगून 25 लाखांना ठकविणाऱ्या टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण हुक्केरी, संकेश्वर, निडसोशी येथील राहणारे असून त्यांच्याजवळून दोन कार व 11 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हे तपास व […]