सामन्यावेळी वीज पडून फुटबॉलपटूचा मृत्यू
इंंडोनियात क्लब सामन्यावेळची घटना
वृत्तसंस्था/ इंडोनेशिया
इंडोनेशियात क्लब फुटबॉल सामन्यावेळी एक दुर्दैवी घटना घडली असून सामना सुरू असतानाच वीज कोसळल्याने फुटबॉलपटूचा मैदानातच मृत्यू झाला.
एफएलओ एफसी व एफबीआय सुबांग या इंडोनेशियातील दोन क्लबमधील संघांत पश्चिम जावातील बान्डुंगमधील सिलिवंगी स्टेडियमवर मैत्रिपूर्ण सामना सुरू होता. त्याच वेळी 35 वर्षीय फुटबॉलपटूच्या अंगावर वीज कोसळली आणि तो लागलीच गतप्राण झाला. वीज पडल्यावर तो खाली कोसळला. काही क्षण त्याचा श्वासही सुरू होता. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तेथे त्याचा मृत्यू झाला. अशीच घटना मागील वर्षीही इंडोनेशियात घडली होती. यू-13 सोरेटिन चषक स्पर्धेतील सामन्यावेळी एक किशोरवयीन फुटबॉलपटू वीज कोसळून ठार झाला होता. त्याचप्रमाणे मागील वर्षीच ब्राझीलमध्येही एका 21 वर्षीय फुटबॉलपटूचा क्लब सामन्यावेळी वीज पडून मृत्यू झाला होता.
Home महत्वाची बातमी सामन्यावेळी वीज पडून फुटबॉलपटूचा मृत्यू
सामन्यावेळी वीज पडून फुटबॉलपटूचा मृत्यू
इंंडोनियात क्लब सामन्यावेळची घटना वृत्तसंस्था/ इंडोनेशिया इंडोनेशियात क्लब फुटबॉल सामन्यावेळी एक दुर्दैवी घटना घडली असून सामना सुरू असतानाच वीज कोसळल्याने फुटबॉलपटूचा मैदानातच मृत्यू झाला. एफएलओ एफसी व एफबीआय सुबांग या इंडोनेशियातील दोन क्लबमधील संघांत पश्चिम जावातील बान्डुंगमधील सिलिवंगी स्टेडियमवर मैत्रिपूर्ण सामना सुरू होता. त्याच वेळी 35 वर्षीय फुटबॉलपटूच्या अंगावर वीज कोसळली आणि तो लागलीच गतप्राण […]