वारखंडे येथे फ्लॅट फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
फेंड्यात आठवडाभरातील तिसरी घटना: बेतोडे चोरीच्या दिवशीचीच ही चोरी : चोरट्याची छबी सीसीटीव्हीमध्ये कैद
फोंडा : फोंडा शहराच्या मध्यवर्ती वारखंडे येथे भारतीय सैन्य दलातील एक माजी सैनिक वास्तव्यास असलेला फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्यांच्या दागिन्यासह सुमारे 6 लाख रूपयांचा ऐवज लांबविला. फोंडा तालुक्यातील सलग तिसरी चोरीची घटना आहे. प्रभूनगर बेतोडा येथे रविवार 7 जून रोजी झालेल्या चोरीच्या घटनेच्या दिवशीच वारखंडे येथील ही चोरी झाल्याचा दावा फ्लटमध्ये राहणाऱ्यांनी केला आहे. नागामशीद अंडरपासजवळील वारखंडे रोडवरील बालाजी मॅन्शन अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर फ्लॅट न. एफ 2 मध्ये माजी सैनिक आपली पत्नी व दोन मुलासह भाड्याने राहत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मुसळधार पावसामुळे सरकारने सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर केली होते. त्यामुळे रविवारी सायंकाळी हे माजी सैनिक आपली पत्नी व दोन समवेत आपल्या मुळगावी कारवार येथे गेले होते. नेमक्या त्याच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फ्लॅटाच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून फ्लॅटात प्रवेश करुन बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने लांबविले. यात त्याच्या पत्नीचे मंगळसुत्र, अन्य एक लहान मंगलसूत्र, सोनसाखळी, अंगठी लांबविली. चोरटयानी हे कृत्य करताना फक्त अस्सल सोन्याचे दागिने असल्याची पडताळणी केल्यानंतर लांबविले आहे. नकली बांगड्या तिथेच ठेवून पलायन केले. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
चोरट्याची छबी सीसीटीव्हीमध्ये कैद
बालाजी मॅन्शन या तीन मजली इमारतीत 12 फ्लॅट्स आहेत. शेजारच्या दुकानामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमधून दोघेजण बालाजी मेन्शनच्या इमारतीत प्रवेश करत पहिल्या मजल्यावरील कुलुपबंद असलेल्या फ्लॅटच्या पायऱ्यावरून रेकी करून खाली उतरल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर परत 20 मिनिटांनी पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा मुख्य दरवाजा फोडून आत प्रवेश घेतला. थेट बेडरूमच्या कपाटातून अस्सल सोन्याचे दागिने लंपास करून केवळ 8 मिनिटात हे कृत्य करून पसार झाले आहे. नागामशिद येथील अंडरपासच्या शेडमध्ये थांबून चोरट्यांनी आराखडा करून हा फ्लॅट टार्गेट केला असावा असा अंदाज असून येथूनच धुमस्टाईल चोरट्यांनी विविध ठिकाणच्या बिल्डींगमध्ये चोरी केल्याचे आढळते. वाढत्या चोऱ्यांचा छडा लावणे सद्या पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर व टिमपुढे मोठे आव्हान आहे.
Home महत्वाची बातमी वारखंडे येथे फ्लॅट फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
वारखंडे येथे फ्लॅट फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
फेंड्यात आठवडाभरातील तिसरी घटना: बेतोडे चोरीच्या दिवशीचीच ही चोरी : चोरट्याची छबी सीसीटीव्हीमध्ये कैद फोंडा : फोंडा शहराच्या मध्यवर्ती वारखंडे येथे भारतीय सैन्य दलातील एक माजी सैनिक वास्तव्यास असलेला फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्यांच्या दागिन्यासह सुमारे 6 लाख रूपयांचा ऐवज लांबविला. फोंडा तालुक्यातील सलग तिसरी चोरीची घटना आहे. प्रभूनगर बेतोडा येथे रविवार 7 जून रोजी झालेल्या चोरीच्या घटनेच्या दिवशीच वारखंडे येथील ही चोरी झाल्याचा दावा फ्लटमध्ये राहणाऱ्यांनी […]