विकसित भारत हीच गॅरंटी

भाजप राष्ट्रीय  कार्यकारिणीत राजनाथ सिंह यांनी मांडला राजकीय प्रस्ताव वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटींवर (हमी) जनतेचा विश्वास असल्याचे स्पष्ट करत येत्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी मताधिक्य गाठले जाईल, असे प्रतिपाद केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास असून पक्षाची प्रगती कशी होईल, पक्षाला […]

विकसित भारत हीच गॅरंटी

भाजप राष्ट्रीय  कार्यकारिणीत राजनाथ सिंह यांनी मांडला राजकीय प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटींवर (हमी) जनतेचा विश्वास असल्याचे स्पष्ट करत येत्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी मताधिक्य गाठले जाईल, असे प्रतिपाद केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास असून पक्षाची प्रगती कशी होईल, पक्षाला पुढे कसे नेता येईल, याची चिंता पंतप्रधानांना प्रत्येक क्षणी सतावत असते. त्यामुळे त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुढील काही दिवस सर्वांनी अविरत मेहनत घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडत विकसित भारताची निर्मिती हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असल्याचा ठरावही बैठकीत करण्यात आला.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपप्रज्वलन करून सुऊवात केली. यावेळी व्यासपीठावर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. दोन दिवसीय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाचा झेंडा फडकावला. या बैठकीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते सामील असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 10 हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. लवकरच देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होणार आहेत. अशा स्थितीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा मुख्य मुद्दा सार्वत्रिक निवडणुका असून त्यामध्ये निवडणुकीची रणनीती यावर चर्चा होत आहे. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावरही भर दिला जाणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होत आहोत ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपण अशा वातावरणात एकत्र आलो आहोत जिथे आपण भूतकाळातही विजय पाहिला होता आणि भविष्यातही विजय पाहायला मिळेल. देशाला, पक्षाला आणि समाजाला नेतृत्व देऊन राजकारणात नवा आयाम प्रस्थापित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपले नेते आहेत. मी आमच्या पंतप्रधानांचे स्वागत आणि अभिनंदन करतो, असे त्यांनी सांगितले. याचदरम्यान मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बंगालमध्ये लवकरच भाजपचे सरकार येणार असल्याचा दावाही केला आहे.
पंतप्रधानांवर स्तुतीसुमने
भारतीय जनसंघ आणि भाजपच्या 7 दशकांच्या इतिहासात आम्ही प्रत्येक कालखंड पाहिला आहे. आम्ही आणीबाणी आणि संघर्षही पाहिला आहे. निवडणुका जिंकण्याची आणि हरण्याची प्रक्रियाही पाहिली आहे, पण गेले दशक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उपलब्धींनी भरले गेल्याचा आनंद आपणा सर्वांनाच असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. देशाचे पंतप्रधान देशाच्या कारभारात पूर्णपणे व्यस्त आहेत, परंतु असे असतानाही पक्ष हाच त्यांचा अग्रक्रम आहे आणि ते नेहमीच पक्षाच्या बाजूने उभे राहिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधानांचे अभिनंदन
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत विकसित भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी असल्यासंबंधी राजकीय प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. याचदरम्यान अयोध्येत राम मंदिर उभारणीची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.
परिषदेला 11.5 हजार प्रतिनिधी उपस्थित
भाजपच्या या बैठकीला भाजपचे सुमारे साडेअकरा हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, खासदार, माजी खासदार, आमदार, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, देशातील सर्व जिह्यांचे जिल्हाध्यक्ष, सर्व पंचायतींचे अध्यक्ष, महापौर, उपमहापौर आदी सहभागी होत आहेत. 18 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता होणार असून ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना 2024 मध्ये पक्षाच्या विजयाचा मंत्र देतील, अशी अपेक्षा आहे.