नागपुरात एका गुन्हेगाराने मित्राची केली हत्या, पैशाच्या वादातून केला गुन्हा
Nagpur News: नागपूरच्या अजनी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून एका गुन्हेगाराने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. हत्येनंतर आरोपीने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.
मिळालेल्या माहितीनुसार पैशासाठी तो मित्राचा छळ करत होता. अजनी येथील रेल्वे क्वार्टर कॉम्प्लेक्समधील अविनाश मैदानाजवळ ही घटना घडली. कुलदीप राजेंद्रसिंग चव्हाण 34 असे मृताचे नाव असून, रीचेश दीपक शिकवार वय 34 असे आरोपीचे नाव आहे.
गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघांनी एकत्र बसून दारू प्यायली. यानंतर रीचेश ने कुलदीपकडे पैशांची मागणी केली मात्र कुलदीपने पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रिचेशने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने कुलदीपचे डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर रीचेश ने अजनी पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.