दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला कारची धडक, पत्नीचा मृत्यू

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वरळीतून हिट अँड रन चे प्रकरण समोर आले आहे. दुचाकीवरून मासे घेण्यासाठी निघालेल्या मासेमार दाम्पत्याच्या दुचाकीला मागून कार ने धडक दिली. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक पळून गेला.

सदर घटना पहाटे 5:30 वाजेची आहे. दुचाकीवरून दाम्पत्य वरळीच्या अट्रिया मॉलसमोरून जात असताना ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य मासेमारीचे काम करतात आणि रविवारी सकाळी मासे घेण्यासाठी गेले असता परत येतांना त्यांच्या दुचाकीला एका कारने मागून जोरदार धडक दिली. नंतर कार चालक पसार झाला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात नेण्यात आले. उपचाराधीन असता तिचा मृत्यू झाला.

वरळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहे. 

Edited by – Priya Dixit  

Go to Source