टमटमच्या धडकेने कॉलेज विद्यार्थिनी जागीच ठार
वार्ताहर /बाळेकुंद्री
कॉलेज संपवून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीला टमटम वाहनाने जोरदार धडक दिल्याने कित्तूर तालुक्यातील उगरखोड गावची तरुणी जागीच ठार झाली. ही घटना कित्तूर शहरात बुधवारी घडली. कावेरी काजगार (वय 21) असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. कावेरी ही कित्तूर शहरातील सरकारी पदवी कॉलेजात तिसऱ्या सेमीस्टरमध्ये शिकत होती. ती बुधवारी कॉलेज संपवून मैत्रीणीच्या घराकडे जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या टमटम वाहनाने धडक देऊन अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक अनिल चिवटगुंडी (रा. देगांव) याला कित्तूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Home महत्वाची बातमी टमटमच्या धडकेने कॉलेज विद्यार्थिनी जागीच ठार
टमटमच्या धडकेने कॉलेज विद्यार्थिनी जागीच ठार
वार्ताहर /बाळेकुंद्री कॉलेज संपवून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीला टमटम वाहनाने जोरदार धडक दिल्याने कित्तूर तालुक्यातील उगरखोड गावची तरुणी जागीच ठार झाली. ही घटना कित्तूर शहरात बुधवारी घडली. कावेरी काजगार (वय 21) असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. कावेरी ही कित्तूर शहरातील सरकारी पदवी कॉलेजात तिसऱ्या सेमीस्टरमध्ये शिकत होती. ती बुधवारी कॉलेज संपवून मैत्रीणीच्या घराकडे […]