Kolhapur Crime : इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीत बंद बंगला फोडला; 12.92 लाखांचा मुद्देमाल लंपास

            12.92  लाखांचा मुद्देमाल लंपास : संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद इचलकरंजी : शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या अयोध्या कॉलनीतील बंद बंगला मध्यरात्रीच्या सुमारास फोडून चोरट्यांनी १२.९२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद विमलादेवी शंभूनाथ केशरबाणी (वय ५३) यांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हीत दोघेही संशयित चोरटे […]

Kolhapur Crime : इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीत बंद बंगला फोडला; 12.92 लाखांचा मुद्देमाल लंपास

            12.92  लाखांचा मुद्देमाल लंपास : संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद
इचलकरंजी : शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या अयोध्या कॉलनीतील बंद बंगला मध्यरात्रीच्या सुमारास फोडून चोरट्यांनी १२.९२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद विमलादेवी शंभूनाथ केशरबाणी (वय ५३) यांनी दिली आहे.
परिसरातील सीसीटीव्हीत दोघेही संशयित चोरटे कैद झाले असून शिवाजीनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, अयोध्या कॉलनीतील श्री दत्त निवास या बंगल्यात शंभूनाथ शामलाल केसरवाणी (बय ५६) कुटुंबासह राहतात.
दहा दिवसांपूर्वी केसरवाणी कुटुंब पुणे येथे घरगुती कार्यक्रमासाठी गेले आहे. या संधीचा फायदा घेत शुक्रवार १४ रोजी मध्यरात्री दोन चोरट्यांनी बंगल्याचे गेट ओलांडून आत प्रवेश करत कटावणीने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्यांनी एका बेडरूमचे तसेच शेजारील खोलीचे कुलूप तोडून कपाटे, बेड इतर साहित्य विस्कटून टाकले.
दोन्ही खोल्यांतील लोखंडी तिजोऱ्या फोडून सुमारे १५.५ तोळे सोन्याचे दागिने, ७०० ग्रॅम चांदीचे दागिने, आणि ३८ हजार रुपये रोख असा सुमारे १२.९२ लाखांचा मुद्देमाल त्यांनी बॅगांमध्ये भरून मागील दरवाजातून चोरटे पसार झाले. चोरीची माहिती समजताच सकाळी साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने घराच्या मागील बाजूस असणाऱ्या उद्यानातून कलानगर मार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला. मात्र तेथून पुढे तो थांबला.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा माल बॅगांमध्ये घेऊन जाणारे दोघे चोरटे दिसत असून पोलिसांनी त्याच्या तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत.