विरोधी आघाडीला स्पष्ट जनादेश!
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला स्पष्ट जनादेश मिळणार आहे. या निवडणुकीची मतगणना झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत आम्ही आमच्या नेत्याच्या नावाची घोषणा करणार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी केले आहे. ते चंदीगढ येथे पत्रकारांशी बोलत होते.
आतापर्यंतच्या पाच मतदान टप्प्यांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी मोठ्या प्रमाणात पुढे आहे. येत्या दोन मतदान टप्प्यांमध्येही आम्ही जिंकणार आहोत. त्यामुळे आम्हाला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळण्यात कोणतीही समस्या येणार नाही. देशाचे नेतृत्व करण्यासाठी आम्ही आमच्या नेत्याची घोषणा 4 जून नंतर तीन दिवसांमध्ये करणार आहोत. 2004 मध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता गेली होती, तसेच यंदाही होणार आहे, असे भाकित त्यांनी केले.
3 दिवसांमध्ये केली होती घोषणा
2004 मध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीचा विजय लोकसभा निवडणुकीत झाल्यानंतर आम्ही 3 दिवसांमध्ये डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाची घोषणा केली होती. तशीच नेत्याच्या नावाची घोषणा यावेळीही करु. संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नावाची निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रमेश यांनी भाजपच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना हा दावा केला आहे.
Home महत्वाची बातमी विरोधी आघाडीला स्पष्ट जनादेश!
विरोधी आघाडीला स्पष्ट जनादेश!
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला स्पष्ट जनादेश मिळणार आहे. या निवडणुकीची मतगणना झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत आम्ही आमच्या नेत्याच्या नावाची घोषणा करणार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी केले आहे. ते चंदीगढ येथे पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंतच्या पाच मतदान टप्प्यांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी मोठ्या प्रमाणात पुढे आहे. येत्या दोन मतदान टप्प्यांमध्येही आम्ही […]