दररोज पाऊस पडणारे शहर

ब्राझीलमधील बेलेम शहर चर्चेत बेलेम हे ब्राझीलमध्ये सर्वात महत्त्वाचे बंदर असलेले शहर आहे. हे शहर वृहद अमेझॉन नदीचे प्रवेशद्वार आहे. बेलेम पारा नदी, अन्य नद्या आणि कालव्यांद्वारे वेगळ्या करण्यात आलेल्या अनेक छोट्या बेटांवर वसलेले आहे. 1616 मध्ये स्थापन बेलेम लाखो रहिवासी असलेले एक मोठे शहर आहे, शहराच्या नव्या हिस्स्यात आधुनिक आणि गगनचुंबी इमारती आहेत. वसाहतकालीन […]

दररोज पाऊस पडणारे शहर

ब्राझीलमधील बेलेम शहर चर्चेत
बेलेम हे ब्राझीलमध्ये सर्वात महत्त्वाचे बंदर असलेले शहर आहे. हे शहर वृहद अमेझॉन नदीचे प्रवेशद्वार आहे. बेलेम पारा नदी, अन्य नद्या आणि कालव्यांद्वारे वेगळ्या करण्यात आलेल्या अनेक छोट्या बेटांवर वसलेले आहे. 1616 मध्ये स्थापन बेलेम लाखो रहिवासी असलेले एक मोठे शहर आहे, शहराच्या नव्या हिस्स्यात आधुनिक आणि गगनचुंबी इमारती आहेत. वसाहतकालीन भागांमध्ये वृक्षांनी भरलेले चौक, चर्च आणि पारंपरिक निळ्या टाइल्सचे आकर्षण आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध वर्षावन आणि त्याच्या रेषेवर असलेल्या बेलेममध्ये जवळपास प्रतिदिन पाऊस पडतो. एकेकाण बेलेम हे दररोज दुपारी 2 वाजता पडणाऱ्या पावसासाठी प्रसिद्ध होते.
बेलेमच्या विमानतळावर पोहोचल्यावर पर्यटकांच्या याच्या या आकर्षणाची आठवण करुन दिली जाते. तसेच एक मोठा बिलबोर्ड ‘तुम्ही 2-ओक्लॉक रेन सिटी’त असल्याची आठवण करून देतो. परंतु हवामान बदलामुळे ‘पावसाचे चक्र’ प्रभावित झाले आहे. कारण आता दिवसातील प्रत्येक तासात येथे पाऊस पडत आहे.
जेव्हा येथे एखादा व्यक्ती व्यावसायिक किंवा आकमिक अपॉइंमेंट घ्यायचा, तेव्हा त्याला तो कोणत्या वेळेत येणार हे विचारले जात नाही, तर त्याला पावसापूर्वी येणार का पावसानंतर हे विचारले जायचे. बेलेममध्ये दुपारी दोन वाजता पाऊस पडणे एक नित्य कार्यक्रम होता. परंतु हवामान बदलाने या शहराच्या दैनंदिन जीवनालाही बदलले आहेस. आता पावसानुसार नियोजन करणे अशक्य आहे. येथे दररोज आणि अनेकदा रात्री मुसळधार पाऊस पडतो.
बदललेल्या स्थितीत बेलममध्ये दररोज मुसळधार पावसानंतर जनजीवन ठप्प होते. अनेकदा केवळ काही वेळासाठी मुसळधार पाऊस पडल्यावर नाल्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी जमा होते.  तसेही बेलेम स्वत:चा समृद्ध इतिहास, जिवंत संस्कृती आणि आश्चर्यजनक नैसर्गिक सौंदर्यासोबत अतिथींना एक अनोखा अनुभव प्रदान करते.