ऑस्ट्रेलियाविरुद्धचा इतिहास बदलण्याची भारतीय महिलांना संधी

वृत्तसंस्था/ मुंबई इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही यश मिळविण्यास उत्सुक असेल. त्यांची ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची एकमेव कसोटी आज गुरुवारपासून येथे सुरू होणार आहे. भारताला 46 वर्षांच्या कालावधीतील त्यांच्या 10 कसोटींपैकी एकाही कसोटीत ऑस्ट्रेलियाला मायदेशी वा विदेशात पराभूत करता आलेले नाही. मात्र यावेळी हा इतिहास बदलण्याची आकांक्षा बाळगून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात […]

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा इतिहास बदलण्याची भारतीय महिलांना संधी

वृत्तसंस्था/ मुंबई
इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही यश मिळविण्यास उत्सुक असेल. त्यांची ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची एकमेव कसोटी आज गुरुवारपासून येथे सुरू होणार आहे. भारताला 46 वर्षांच्या कालावधीतील त्यांच्या 10 कसोटींपैकी एकाही कसोटीत ऑस्ट्रेलियाला मायदेशी वा विदेशात पराभूत करता आलेले नाही. मात्र यावेळी हा इतिहास बदलण्याची आकांक्षा बाळगून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरेल.
या संघाला चांगलेच माहीत आहे की, ते फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर खेळत आहेत आणि हे लक्षात घेता ऑस्ट्रेलियावर विजय मिळविण्याच्या दृष्टीने यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. भारतीय गोलंदाजांनी, विशेषत: ऑफस्पिनर दीप्ती शर्माने गेल्या आठवड्यात डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी केली. या कसोटीत भारताने 347 धावांनी शानदार विजय मिळवला. महिला क्रिकेटच्या कसोटी इतिहासातील हा धावांच्या दृष्टीने सर्वांत मोठा विजय आहे आणि ही विजयी परंपरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील कायम ठेवण्यास संघ उत्सुक असेल.
पण भारताच्या गोलंदाजीची धार दीप्तीपुरतीच मर्यादित नाही. रेणुका सिंह ठाकूरने दुखापतीतून सावरून परत आल्यापासून नवीन चेंडूवर लवकर यश मिळवून दाखविलेले आहे आणि तिची सहकारी वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारचाही उत्साह इंग्लंडविऊद्ध तीन बळी घेतल्याने वाढलेला असेल. हरमनप्रीत कौर (नाबाद 49 आणि 44), जेमिमा रॉड्रिग्स (68) आणि यास्तिका भाटिया (66) यांनी इंग्लंडविऊद्ध चांगला प्रभाव पाडल्यामुळे भारताची फलंदाजीही भक्कम असल्याचे दिसत आहे.
तथापि, भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविऊद्ध मोठी खेळी करून दाखवावी अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असेल. भारताला यावेळी डावखुऱ्या शुभा सतीशशिवाय उतरावे लागले, जिला इंग्लंडविऊद्ध पदार्पणात अर्धशतक झळकावल्यानंतर हेअरलाइन फ्रॅक्चरला सामोरे जावे लागलेले आहे. तिच्या जागी प्रिया पुनिया भारतीय संघात सामील झाली आहे. असे असले, तरी मंगळवारी भरपूर सराव केलेल्या हरलीन देओलचीही संघात वर्णी लागू शकते. जवळजवळ 40 वर्षांच्या कालावधीनंतर भारतात कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी परतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची नवनियुक्त कर्णधार अॅलिसा हिली आणि तिच्या सहकाऱ्यांसमोरील आव्हान काही कमी कठीण नाही.
योगायोग म्हणजे वानखेडेवरच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील भारतातील शेवटची कसोटी फेब्रुवारी, 1984 मध्ये खेळली गेली होती. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना दोन वर्षांपूर्वी कारारा येथे खेळला गेला हाता. त्यामध्ये स्मृती मानधनाच्या पहिल्या डावातील 127 धावांमुळे भारतीय संघाला सामना अनिर्णीत राखण्यात मदत झाली होती. हिलीने मेग लॅनिंगकडून ऑस्ट्रेलियन नेतृत्वाची धुरा स्वीकारली आहे आणि सुऊवातीलाच भारताविऊद्ध त्यांच्या भूमीत कसोटी खेळणे ही तिच्यासाठी एक मोठी परीक्षा असेल. ऑस्ट्रेलियाकडे बऱ्याच अष्टपैलू खेळाडू असून यात अनुभवी एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, बेथ मुनी आणि ताहलिया मॅकग्रा यांचा समावेश आहे.
संघ : भारत-हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तितास साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार.
ऑस्ट्रेलिया-अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, लॉरेन चीटल, हेदर ग्रॅहम, अॅश्ले गार्डनर, किम गर्थ, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.
 

Go to Source