मनोज जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल
मराठा आरक्षणावरून सध्या शिंदे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरु आहे. आंतरवालीतील मंडप हटवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून आता यावरून मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहे. त्यांचे काही समर्थक देखील आक्रमक झाले असून त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्राह्मण समाजासाठी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. काल जरांगे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी बोलताना काही अपशब्द वापरले असतील तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. असे ते म्हणाले.
Edited by – Priya Dixit