दक्षिण चीन समुद्रात जहाज उलटले, २ फिलिपिनो मृत्युमुखी तर अनेक बेपत्ता

दक्षिण चीन समुद्रात एक मालवाहू जहाज उलटल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.

दक्षिण चीन समुद्रात जहाज उलटले, २ फिलिपिनो मृत्युमुखी तर अनेक बेपत्ता

दक्षिण चीन समुद्रात एक मालवाहू जहाज उलटल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण चीन समुद्रात एक मालवाहू जहाज उलटल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे. या घटनेत दोन फिलिपिनो खलाशी मृत्युमुखी पडले, तर इतर चार जण अजूनही बेपत्ता आहे.

ALSO READ: अमेरिकेतील फेडरल एजंट्सनी एका ५ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतल्याने खळबळ, कमला हॅरिसची प्रतिक्रिया

हे जहाज फिलीपिन्सहून चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात लोहखनिजाचा माल घेऊन जात होते. त्यात एकूण २१ फिलिपिनो क्रू मेंबर्स होते. चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सदर्न थिएटर कमांड अंतर्गत चिनी कोस्ट गार्ड आणि नौदलाने संयुक्त बचाव मोहीम राबवली. शुक्रवारपर्यंत १७ जणांना वाचवण्यात आले आहे, त्यापैकी १४ जणांची प्रकृती स्थिर आहे. २ जणांचा मृत्यू झाला आहे. 

उर्वरित चार जण अजूनही बेपत्ता आहे आणि शोध मोहीम सुरू आहे.

ALSO READ: मालेगाव न्यायालयाने संजय राऊत यांना दंड ठोठावला; न्यायालयात अनुपस्थिती महागात पडली

Edited By- Dhanashri Naik

Go to Source