बंदावस्थेत असलेल्या कारला वडगावात अचानक आग

बेळगाव : बंदावस्थेत उभ्या असलेल्या कारला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग विझवली. वडगाव येथील वझे गल्ली कॉर्नरजवळ ही घटना घडली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या कारने पेट घेतला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वाय. बी. वालीकार, अशोक पाटील, […]

बंदावस्थेत असलेल्या कारला वडगावात अचानक आग

बेळगाव : बंदावस्थेत उभ्या असलेल्या कारला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग विझवली. वडगाव येथील वझे गल्ली कॉर्नरजवळ ही घटना घडली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या कारने पेट घेतला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वाय. बी. वालीकार, अशोक पाटील, चन्नबसाप्पा वारी, अशोक हळेगौडर, भरतेश यांचा समावेश असलेले पथक बंबासह दाखल झाले. त्यांनी पाणी मारून आग विझवली. जवळच कचरा पेटविल्यामुळे ठिणगी उडून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.