फ़ुटबाँल मैदानात इमारतीचे शेड कोसळून भीषण अपघात, 8 मुले जखमी
ठाण्यातील फ़ुटबाँल टर्फक्लब मध्ये इमारतीचे टिनचे शेड कोसळून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात अनेक मुले जखमी झाली असून त्यांना रुग्णलयात दाखल केले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.
सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वारे आणि मुसळधार पाऊसामुळे ठाण्यातील फ़ुटबाँल मैदानांवर एका इमारतीचा मोठा पत्रा कोसळला त्यात मैदानावर खेळत असलेले 8 मुले जखमी झाले.
जखमी मुलांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात जखमी झालेल्या मुलांमध्ये 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.
सध्या ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. फ़ुटबाँल टर्फवर मुले खेळत असताना पाऊस सुरु झाला आणि लहान मुलांना घरी पाठवण्यात आले मोठी मुले तिथेच खेळत होते. खेळत असताना इमारतीचा पत्रा कोसळला आणि मुलांच्या अंगावर पडला आणि मुले जखमी झाली.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात जखमी मुलांची भेट घेतली आहे.या घटनेबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. कुटुंबाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असे ते म्हणाले. आम्ही सर्व जबाबदारी घेऊ, असे डॉक्टर आणि प्रशासनाला सांगितले आहे. त्याच्यावर चांगले उपचार केले जात आहेत
Edited by – Priya Dixit