सोलापुरात आजीसमोर दुचाकीस्वाराची 6 वर्षांच्या नातवाला धडक, नातवाचा दुर्देवी मृत्यू
Solapur News : सोलापूरमधील जेंत्याल चौकापासून शास्त्रीनगर रस्त्यावर शनिवारी रात्री आजी सोबत जात असलेल्या नातवाला दुचाकीने जोरदार धडक देण्याची घटना घडली असून या अपघातात 6 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
ALSO READ: नाशिकमध्ये राज्यपालांसह देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि संजय राऊत उपस्थित
सोलापुरातील शास्त्रीनगर रस्त्यावर शनिवारी 6 वर्षाचा शिवांशु आजीसोबत रिक्षाने घरी जात होता. घरी जण्यासाठी रिक्षाने रास्ता ओलांडताना समोरून दुचाकीवरून दोन मुली येत असून त्यांच्या दुचाकीने शिवांशुला जोरदार धडक दिली. या धडकेत शिवांशुच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
ALSO READ: बकरी ईदपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार
नागरिकांनी त्याला तातडीने रिक्षेतून रुग्णालयात नेले. त्याच्या डोक्यातून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला . त्याच्या मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अज्ञात महिला दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: संजय राऊत यांनी नाशिक कुंभमेळ्यावरून महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले