पुण्यात भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू

पुण्यात पोर्श कार अपघातानंतर आता पुन्हा एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नाशिक रस्त्यावर आंबेगाव तालुक्यातील मौजे एकलहरे गावाजवळ शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या …

पुण्यात भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू

पुण्यात पोर्श कार अपघातानंतर आता पुन्हा  एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नाशिक रस्त्यावर आंबेगाव तालुक्यातील मौजे एकलहरे गावाजवळ शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

ओम भालेराव असे या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपीने पुणे- नाशिक मार्गावर मंचर गावाजवळ चुकीच्या दिशेने गाडी चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला रात्री उशिरा अटक केली.

 

Edited by – Priya Dixit  

Go to Source