नागपुरात स्कुटरवरून खाली पडून ट्रकने चिरडून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नागपुरात डान्स क्लासला जात असलेल्या मुलीचा आजोबांच्या स्कुटर वरून पडून मिनी ट्रक ने चिरडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नागपुरात स्कुटरवरून खाली पडून ट्रकने चिरडून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नागपुरात डान्स क्लासला जात असलेल्या मुलीचा आजोबांच्या स्कुटर वरून पडून मिनी ट्रक ने चिरडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

सदर घटना प्रताप नगर भागात घडली असून पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की , गोपाळ नगर ते पडोळे चौकात मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला.

7 वर्षाची मुलगी आपल्या आजोबांसह स्कुटरवर बसून डान्स क्लासला जात असताना त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली.आणि तोल जाऊन आजोबा आणि मुलगी स्कुटरवरून खाली पडले. त्याचा दिशेने जणाऱ्या मिनी ट्रकने मुलीला चिरडले. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. 

मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात नेण्यात आले असता तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यासाठी तपास सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Edited By – Priya Dixit 

Go to Source