35 फुटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नुकतेच अनावरण झाले होते
Photo – Twitter
सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 35 फुटांचा पुतळा सोमवारी कोसळला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या सर्व प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर घणाघात वार केले आहे. त्यांनी या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत शिंदे सरकारला चांगलेच फटकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान असून पुतळ्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे केले असून त्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले असून वर्षभराच्या आतच हा पुतळा कोसळला त्याअर्थी पुतळ्याच्या निर्माणाचे काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष… pic.twitter.com/sCwo9eVMbK
— Supriya Sule (@supriya_sule) August 26, 2024
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे. देशाचे पंतप्रधान एखाद्या स्मारकाचे उदघाटन करतात तर त्याचे बांधकाम चांगल्या प्रतीचे असल्याची खात्री देशाची जनतेला असते.मात्र हा पुतळा कोसळल्याने ही सरळ पंतप्रधानांची आणि जनतेची फसवणूक असल्याचे दिसून येते.यावर चौकशी व्हायलाच हवी. असे खडे बोल त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
Edited by – Priya Dixit