कोस्टल रोडला 325 मीटर लांबीचा पादचारी मार्ग जोडणार

मुंबईतील (mumbai)  कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत असलेल्या पादचारी आणि सायकल मार्गातील तुटलेली कडी जोडण्यासाठी पालिकेने निविदा जाहीर केली आहे. या निविदेनुसार वरळीतील (worli) लोटस जेट्टी आणि बडोदा पॅलेस बिल्डिंग यांच्यामधील 320 ते 325 मीटर लांबीचा पादचारी मार्ग जोडला जाणार आहे. या कामासाठी पालिकेला अंदाजे 9.64 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. कोस्टल रोडवरील (coastal road project)  7.5 किलोमीटरचा फूटपाथ व रस्ता नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून 24 तास खुला करण्यात आला आहे. यामध्ये प्रियदर्शिनी पार्क ते हाजी अली आणि बडोदा पॅलेस ते वरळी पर्यंतच्या 5.25 किमी पट्टा तसेच पूनम चेंबर्स–वरळी बोस्ट्रिंग आर्च ब्रिजदरम्यानच्या भागाचा समावेश आहे. दरम्यान कोस्टल रोडसाठी पुनर्भरण केलेल्या 111 हेक्टर भूभागापैकी 70 हेक्टर जागा खुला परिसर, थीम झोन आणि पादचारी मार्गांसाठी (pedestrian walkway) राखीव आहे. यापैकी सद्यस्थितीत पादचारी मार्ग प्रियदर्शिनी पार्क ते लोट्स जेट्टी आणि बडोदा पॅलेस ते जे. के. कपूर चौक, वरळी या दोन तुकड्यांमध्ये विभागला आहे. पालिकेने दोन्ही पट्ट्यामधील 325 मीटर अंतर असलेले मार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण पादचारी मार्ग 7.25 ते 7.5 किलोमीटर लांबीचा असणार आहे, जो मरिन ड्राइव्हच्या (marine drive) पादचारी मार्गापेक्षा दुप्पट लांब असेल. याची रुंदी 8 ते 20 मीटरपर्यंत असणार आहे. या नवीन 325 मीटरच्या भागात 2 मीटर रुंदीचा सायकल ट्रॅकदेखील (cycle track) प्रस्तावित आहे.हेही वाचा गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी झाडे तोडण्यास परवानगी पण… …म्हणून निवडणुकांना स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

कोस्टल रोडला 325 मीटर लांबीचा पादचारी मार्ग जोडणार

मुंबईतील (mumbai)  कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत असलेल्या पादचारी आणि सायकल मार्गातील तुटलेली कडी जोडण्यासाठी पालिकेने निविदा जाहीर केली आहे. या निविदेनुसार वरळीतील (worli) लोटस जेट्टी आणि बडोदा पॅलेस बिल्डिंग यांच्यामधील 320 ते 325 मीटर लांबीचा पादचारी मार्ग जोडला जाणार आहे. या कामासाठी पालिकेला अंदाजे 9.64 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.कोस्टल रोडवरील (coastal road project)  7.5 किलोमीटरचा फूटपाथ व रस्ता नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून 24 तास खुला करण्यात आला आहे. यामध्ये प्रियदर्शिनी पार्क ते हाजी अली आणि बडोदा पॅलेस ते वरळी पर्यंतच्या 5.25 किमी पट्टा तसेच पूनम चेंबर्स–वरळी बोस्ट्रिंग आर्च ब्रिजदरम्यानच्या भागाचा समावेश आहे. दरम्यान कोस्टल रोडसाठी पुनर्भरण केलेल्या 111 हेक्टर भूभागापैकी 70 हेक्टर जागा खुला परिसर, थीम झोन आणि पादचारी मार्गांसाठी (pedestrian walkway) राखीव आहे. यापैकी सद्यस्थितीत पादचारी मार्ग प्रियदर्शिनी पार्क ते लोट्स जेट्टी आणि बडोदा पॅलेस ते जे. के. कपूर चौक, वरळी या दोन तुकड्यांमध्ये विभागला आहे. पालिकेने दोन्ही पट्ट्यामधील 325 मीटर अंतर असलेले मार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे.हा संपूर्ण पादचारी मार्ग 7.25 ते 7.5 किलोमीटर लांबीचा असणार आहे, जो मरिन ड्राइव्हच्या (marine drive) पादचारी मार्गापेक्षा दुप्पट लांब असेल. याची रुंदी 8 ते 20 मीटरपर्यंत असणार आहे.या नवीन 325 मीटरच्या भागात 2 मीटर रुंदीचा सायकल ट्रॅकदेखील (cycle track) प्रस्तावित आहे.हेही वाचागोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी झाडे तोडण्यास परवानगी पण……म्हणून निवडणुकांना स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

Go to Source