गर्लफ्रेंडची लोखंडी रॉडने हत्या, बॉयफ्रेंड अटकेत

45 वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या (murder) केल्याच्या आरोपाखाली एमएचबी पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाला रविवारी अटक केली. रविवारी केईएम रुग्णालयात या महिलेचा मृत्यू झाला.  पोलिसांनी सांगितले की, मृत महिला पूर्वी तिच्या पतीसोबत दहिसर (dahisar) येथे राहत होती. पतीसोबत वादानंतर ते वेगळे झाल्यानंतर ती तिच्या कथित प्रियकर राजीव शहा याच्यासोबत बोरिवली (borivali) पश्चिम येथील एमएचबी परिसरातील गणपत पाटील नगरमध्ये राहू लागली. दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात शहाने लोखंडी रॉड उचलून तिच्या डोक्यात वार केला. त्यानंतर ही महिला जळत्या भांड्यावर पडली आणि भाजून जखमी झाली. त्यानंतर शाह घटनास्थळावरून पळून गेला. शेजाऱ्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर एमएचबी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, शहा आणि महिला एकाच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत.  लग्नानंतर महिला मुंबईत (mumbai) आली आणि दहिसर येथे राहात होती. शहा काही वर्षांपूर्वी मुंबईत आला आणि तो तिला अनेकदा दहिसरमध्ये भेटायचा. नंतर ते एकत्र राहू लागले, तेव्हा शाहला संशय आला की तिचे आणखी कोणाशी तरी संबंध आहेत, या मुद्द्यावरून त्यांच्यात सतत भांडणं व्हायची, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कलम 103 (हत्या) अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे झोन 11 चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.हेही वाचा ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला मध्य रेल्वे थेट ऑफिसर करणार! लोखंडवाला-यारी रोडला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी मार्ग मोकळा

गर्लफ्रेंडची लोखंडी रॉडने हत्या, बॉयफ्रेंड अटकेत

45 वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या (murder) केल्याच्या आरोपाखाली एमएचबी पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाला रविवारी अटक केली. रविवारी केईएम रुग्णालयात या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृत महिला पूर्वी तिच्या पतीसोबत दहिसर (dahisar) येथे राहत होती. पतीसोबत वादानंतर ते वेगळे झाल्यानंतर ती तिच्या कथित प्रियकर राजीव शहा याच्यासोबत बोरिवली (borivali) पश्चिम येथील एमएचबी परिसरातील गणपत पाटील नगरमध्ये राहू लागली.दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात शहाने लोखंडी रॉड उचलून तिच्या डोक्यात वार केला. त्यानंतर ही महिला जळत्या भांड्यावर पडली आणि भाजून जखमी झाली. त्यानंतर शाह घटनास्थळावरून पळून गेला.शेजाऱ्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर एमएचबी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, शहा आणि महिला एकाच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. लग्नानंतर महिला मुंबईत (mumbai) आली आणि दहिसर येथे राहात होती. शहा काही वर्षांपूर्वी मुंबईत आला आणि तो तिला अनेकदा दहिसरमध्ये भेटायचा. नंतर ते एकत्र राहू लागले, तेव्हा शाहला संशय आला की तिचे आणखी कोणाशी तरी संबंध आहेत, या मुद्द्यावरून त्यांच्यात सतत भांडणं व्हायची, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.कलम 103 (हत्या) अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे झोन 11 चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.हेही वाचाऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला मध्य रेल्वे थेट ऑफिसर करणार!लोखंडवाला-यारी रोडला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी मार्ग मोकळा

Go to Source