Mahad: 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वडिलांच्या पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने वडिलांची पिस्तूल काढून स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायगडच्या महाड शहरात तांबट आळी परिसरात गुरुवारी दुपारी घडली आहे.

हा मुलगा नैराश्यात होता याने हे टोकाचे पाऊल का घेतले अद्याप हे समजू शकले नाही. तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता आणि शाळेत जात नव्हता. त्याने पिस्तूल तोंडात धरत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी हा मुलगा घरी एकटाच होता. त्याने वडिलांचा परवाना असलेल्या पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडली. 

 महाड पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. हे प्रकरण आत्महत्याचे आहे की घातपाताचे याचा तपास पोलीस घेत आहे.   

Edited by – Priya Dixit   

Go to Source