900 रुपये चोरीचा संशय घेऊन 12 वर्षाच्या मुलाची हत्या

बिहारमधील मुजफ्फरपूर मध्ये एक भयंकर बातमी समोर आली आहे. 12 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. तसेच हत्येनंतर त्याचा मृतदेह झाडावर लटकवण्यात आला. मिळलेल्या माहितीनुसार 900 रुपये चोरले असा संशय घेत या लहान मुलाची हत्या करून त्याला झाडावर लटकवण्यात …

900 रुपये चोरीचा संशय घेऊन 12 वर्षाच्या मुलाची हत्या

बिहारमधील मुजफ्फरपूर मध्ये एक भयंकर बातमी समोर आली आहे. 12 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. तसेच हत्येनंतर त्याचा मृतदेह झाडावर लटकवण्यात आला. मिळलेल्या माहितीनुसार 900 रुपये चोरले असा संशय घेत या लहान मुलाची हत्या करून त्याला झाडावर लटकवण्यात आले. 

 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकरी टीम सह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या लहान मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवला. 

 

मिळलेल्या माहितीनुसार या लहान मुलाने पंचायतमध्ये आपला गुन्हा कबूल केला व त्याच्या वडिलांनी 900 रुपये पंचायतला परत करू असते सांगितले. पण त्याच रात्री हा लहान मुलगा बेपत्ता झाला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. पोलीस अधिकारींनी सांगितले की एका लहान मुलाला मृत अवस्थेत झाडाला लटकवण्यात आले होते. घटनास्थळी FSL टीम शोध घेत आहे. व नमुने गोळा केले जात आहे.

Edited By- Dhanashri Naik  

 

Go to Source