ज्येष्ठ नागरिकांसोबत सुट्टीचे नियोजन करताना त्यांचा प्रवास त्रासमुक्त, सुरक्षित आणि आरामदायी होणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. हॉटेल आणि पर्यटनस्थळ निवडताना खालील महत्त्वाच्या मुद्द्यांची काळजी घ्यावी:

 

१. हॉटेल निवडताना टिप्स

लिफ्ट किंवा तळ मजला : हॉटेल बुक करताना तेथे लिफ्टची सोय आहे का किंवा तळमजल्यावर रूम उपलब्ध आहे का, याची आधीच खात्री करून घ्या.

 

बाथरूम सुरक्षा : बाथरूममध्ये पकडण्यासाठी हँडल्स/ग्रॅब बार, वेस्टर्न टॉयलेट, आणि स्लिप होणार नाहीत अशा टाईल्स असणे अत्यंत आवश्यक आहे.

 

वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन मदत: हॉटेल रुग्णालयाजवळ किंवा डॉक्टर-ऑन-कॉल सुविधा देणारे असावे.

 

शांत वातावरण आणि सात्विक जेवण: मुख्य बाजारातील गोंधळापासून थोडे दूर, शांत परिसरातील हॉटेल निवडा. तसेच हॉटेलमध्ये कमी तिखट-तेलकट आणि ताजे जेवण  मिळण्याची सोय असावी.

 

२. पर्यटनस्थळ निवडतानाच्या टिप्स

कमित कमी चालणे आणि पायऱ्या: जास्त पायऱ्या असणारे किल्ले, कठीण टेकड्या किंवा खूप चढाव असलेली ठिकाणे टाळावीत. सपाट रस्ते, बोटींग किंवा कारने फिरता येतील अशा ठिकाणांना प्राधान्य द्या.

 

आल्हाददायक हवामान: अतिथंडी, अतिउष्णता किंवा जास्त दमट  हवामान असलेली ठिकाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकतात.

 

गर्दीमुक्त आणि संथ वेग : एका दिवसात जास्तीत जास्त १ ते २ ठिकाणेच फिरण्याचे नियोजन करा. दुपारच्या वेळी हॉटेलवर विश्रांती घेण्यासाठी वेळ ठेवा.

 

सुलभ वाहतूक सोयी: ज्या ठिकाणी थेट गाड्या पॉईंट्सपर्यंत जातात, बॅटरी कार  किंवा व्हीलचेअरची सोय उपलब्ध असते, अशी ठिकाणे उत्तम मानली जातात.

 

ज्येष्ठांसाठी काही उत्तम आणि आरामदायी पर्याय:

महाराष्ट्र: गणपतीपुळे, नाशिक, महाबळेश्वर (आतील गावे/शांत रिसॉर्ट्स), वाई.

भारतात: केरळ बॅकवॉटर (हाउसबोट), म्हैसूर, पॉंडिचेरी, ऋषिकेश.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.