श्राद्धपक्षात (पितृपक्षात) पूर्वजांच्या नैवेद्यासाठी तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते.  अत्यंत सात्विक आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेली तांदळाची खीर कशी बनवावी जाणून घ्या…..

 

साहित्य-

तांदूळ (आंबेमोहर किंवा बास्मती तुकडा): ¼ कप

दूध: १ लिटर (फुल क्रीम)

साखर किंवा किसलेला गूळ: ½ कप (चवीनुसार)

साजूक तूप: १ ते २ मोठे चमचे

वेलची-जायफळ पूड: १ लहान चमचा

चारोळी व काजू-बदामाचे तुकडे: २ मोठे चमचे

केशर: ५-६ काड्या (ऐच्छिक)

 

कृती-

तांदूळ भिजवणे व बारीक करणे:तांदूळ स्वच्छ धुऊन १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी पूर्णपणे काढून तांदूळ सुती कपड्यावर वाळवून घ्या आणि मिक्सरला थोडे जाडसर (रव्यासारखे) फिरवून घ्या

 

तांदूळ तुपात भाजणे:एका कढईत १ चमचा साजूक तूप गरम करा. त्यात जाडसर वाटलेला तांदूळ मंद आचेवर छान सुवास सुटेपर्यंत २ ते ३ मिनिटे परतून घ्या.

 

दूध उकळणे व तांदूळ शिजवणे:दुसऱ्या जाड बुडाच्या भांड्यात १ लिटर दूध उकळत ठेवा. दूध उकळल्यावर त्यात भाजलेला तांदूळ घाला. मंद आचेवर सतत हलवत तांदूळ पूर्णपणे मऊ शिजवून घ्या (सुमारे १२ ते १५ मिनिटे).

 

ड्रायफूट्स व साखर मिसळणे:तांदूळ छान मऊ शिजून खीर घट्ट झाल्यावर त्यात साखर (किंवा गूळ), तुपात तळलेले काजू, बदाम, चारोळी आणि केशर घाला. साखर विरघळेपर्यंत आणखी ४-५ मिनिटे मंद आचेवर उकळा.

 

वेलची-जायफळ पूड घालणे:गॅस बंद करण्यापूर्वी शेवटी १ लहान चमचा वेलची-जायफळ पूड घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.

 

श्राद्धाच्या नैवेद्यासाठी विशेष टीप:श्राद्धपक्षात नैवेद्याचे ताट वाढताना खिरीवर साजूक तुपाची धार सोडून तुळशीचे पान ठेवण्याची परंपरा आहे.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: श्राद्धपक्षातील आमसुलाची चटणी रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: सर्व पितृ अमावस्येसाला पितरांना अर्पण करा सात्विक पदार्थ खीर आणि पुरी