गौरी-गणपती उत्सवासाठी बिना साखरेचे, पौष्टिक आणि झटपट होणारे ड्रायफ्रूट्स खजूर रोल बनवण्याची सोपी पाककृती जाणून घ्या…
साहित्य-
खजूर: २ कप (बिया काढलेले व बारीक चिरलेले किंवा मिक्सरवर जाडसर फिरवलेले)
मिश्र ड्रायफ्रूट्स: १ कप (काजू, बदाम, पिस्ता – बारीक तुकडे केलेले)
खसखस: २ चमचे
तूप: २ चमचे
वेलची आणि जायफळ पूड: १/२ चमचा
अंजीर (पर्यायी): ४-५ (बारीक चिरलेले)
कृती-
ड्रायफ्रूट्स भाजणे: कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यात काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे मंद आचेवर २-३ मिनिटे खमंग भाजून एका प्लेटमध्ये काढून घ्या.
खसखस भाजणे: त्याच कढईत खसखस १ मिनिट मंद आचेवर हलकीशी भाजून घ्या आणि वेगळी काढून ठेवा.
खजूर शिजवणे: कढईत उरलेले १ चमचा तूप घाला. त्यात बारीक केलेले खजूर (व अंजीर वापरणार असाल तर ते) घालून मंद आचेवर सतत हलवत राहा. खजूर मऊ होईपर्यंत व त्याचा गोळा होईपर्यंत (सुमारे ४-५ मिनिटे) परता.
मिश्रण एकत्र करणे: खजूर मऊ झाल्यावर त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची-जायफळ पूड घाला. सर्व साहित्य नीट एकत्र मिस्क करा आणि गॅस बंद करा.
रोल बनवणे: मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला हलके तूप लावा आणि मिश्रणाचा लांबट रोल (सिलिंडर आकार) तयार करा.
खसखसचे कोटिंग: बटर पेपर किंवा प्लॅस्टिक शीटवर भाजलेली खसखस (आणि हवे असल्यास बारीक पिस्त्याचे काप) पसरवा. तयार केलेला खजूर रोल यावर फिरवून खसखस रोलला सर्व बाजूने व्यवस्थित चिकटवून घ्या.
सेट करणे: रोल बटर पेपरमध्ये घट्ट गुंडाळून (Wrap करून) ३० ते ४० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तो छान सेट होईल.
कापणे: फ्रीजमधून रोल काढून त्याच्या सुरीने गोल चकत्या (वड्या) कापून घ्या. गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल तयार आहे! हे रोल हवाबंद डब्यात १०-१५ दिवस छान टिकतात.
ALSO READ: चॉकलेट आणि खोबऱ्याची अप्रतिम जोडी: इन्स्टंट चॉकलेट कोकोनट लाडू Ganpati Naivedyam
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: गणेशोत्सवात श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी पौष्टिक आणि अत्यंत खुसखुशीत ”मखाना पाग बर्फी”
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा