बेक्ड फेटा पास्ता ही बनवायला अत्यंत सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी सोशल मीडिया व्हायरल डिश आहे.
साहित्य-

पास्ता: २५० ग्रॅम (पेन्ने किंवा फुसिली पास्ता)

फेटा चीज : २०० ग्रॅमचा एक ब्लॉक

चेरी टोमॅटो: २ कप (सुमारे ४०० ग्रॅम)

लसूण: ६-७ पाकळ्या (बारीक चिरलेल्या किंवा खिसलेल्या)

ऑलिव्ह ऑइल: १/२ कप

मसाले: १ लहान चमचा चिली फ्लेक्स, १ लहान चमचा ओरिगॅनो / इटालियन हर्ब्स

मीठ व काळी मिरी पूड: चवीनुसार

तुळशीची पाने : सजावटीसाठी आणि चवीसाठी (बारीक चिरलेली)

 

कृती

१. बेकिंग ट्रे तयार करणे-एका बेकिंग डिशमध्ये चेरी टोमॅटो, लसूण, थोडे ऑलिव्ह ऑइल, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, मीठ आणि काळी मिरी घालून व्यवस्थित मिक्स करा.

 

२. चीज ठेवून बेक करणे-डिशच्या मध्यभागी फेटा चीजचा ब्लॉक ठेवा. चीजवर उरलेले ऑलिव्ह ऑइल आणि थोडे ओरिगॅनो टाका. २००°C वर ओव्हन आधी गरम करून २५ ते ३० मिनिटे बेक करा. टोमॅटो मऊ होऊन फुटू लागतील आणि चीज छान वितळून हलके सोनेरी होईल.

 

३. पास्ता उकडणे-बेक होईपर्यंत एका भांड्यात पाणी उकळून त्यात थोडे मीठ घालून पास्ता ‘अल दांते’ (८०% शिजलेला) उकडून घ्या. पास्ता उकडलेले १/२ कप पाणी बाजूला काढून ठेवा.

 

४. सॉस एकत्र करणे ओव्हनमधून डिश बाहेर काढून गरम असतानाच काट्याचमचाने  टोमॅटो आणि फेटा चीज एकत्र चुरडून क्रीमी सॉस तयार करा.

 

५. मिक्सिंग-या क्रीमी सॉसमध्ये उकडलेला पास्ता आणि बाजूला ठेवलेले गरम पास्ताचे पाणी घाला. सर्व साहित्य नीट मिक्स करा. गरमागरम पास्त्यावर ताजी तुळशीची पाने  घालून सर्व्ह करा!

ALSO READ: ग्रीन पास्ता रेसिपी

जर तुमच्याकडे ओव्हन नसेल, तर तुम्ही ही संपूर्ण कृती मंद आचेवर झाकण ठेवून जाड बुडाच्या कढईत किंवा पॅनमध्येही करू शकता.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: मुलांसाठी खास बनवा आंबट-गोड पास्ता रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: घरी पास्ता बनवताना ही १ चूक कधीच करू नका! हॉटेलच्या शेफने सांगितलेलं ते सीक्रेट उघड!