आयशर मोटर्सला 996 कोटीचा नफा

नवी दिल्ली : ऑटो क्षेत्रातील कंपनी आयशर मोटर्स यांनी आपल्या डिसेंबरअखेरचा तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीने निव्वळ नफ्यामध्ये 34 टक्के वाढ दर्शवली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये तिसऱ्या तिमाहीत आयशर मोटर्सने 996 कोटी रुपये इतके एकत्रित निव्वळ नफ्याअंतर्गत कामावले आहेत. कंपनीने याच अवधीमध्ये 12 टक्के वाढीसह 4179 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त […]

आयशर मोटर्सला 996 कोटीचा नफा

नवी दिल्ली :
ऑटो क्षेत्रातील कंपनी आयशर मोटर्स यांनी आपल्या डिसेंबरअखेरचा तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीने निव्वळ नफ्यामध्ये 34 टक्के वाढ दर्शवली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये तिसऱ्या तिमाहीत आयशर मोटर्सने 996 कोटी रुपये इतके एकत्रित निव्वळ नफ्याअंतर्गत कामावले आहेत. कंपनीने याच अवधीमध्ये 12 टक्के वाढीसह 4179 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. सदरच्या नफ्याच्या निकालानंतर बुधवारी कंपनीचा समभाग 2 टक्के घसरत 3756 रुपयांवर व्यवहार करत होता. सीएलएसए या ब्रोकरेज फर्मने समभाग 3906 पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.