९० वर्षांच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क

                               कोथळीतील 91 वर्षीय सुमनबाई आजीने दाखवली मतदानाची प्रेरणा धाराशिव उमरगा : उमरगा तालुक्यातील कोथळी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान लोकशाहीचा खरा उत्साह पाहायला मिळाला. वाढत्या वयाची तमा न बाळगता, कोथळी येथील ९१ वर्षीय आजी सुमनबाई नेमीनाथ गुरव […]

९० वर्षांच्या आजींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क

                               कोथळीतील 91 वर्षीय सुमनबाई आजीने दाखवली मतदानाची प्रेरणा
धाराशिव उमरगा : उमरगा तालुक्यातील कोथळी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान लोकशाहीचा खरा उत्साह पाहायला मिळाला. वाढत्या वयाची तमा न बाळगता, कोथळी येथील ९१ वर्षीय आजी सुमनबाई नेमीनाथ गुरव यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
त्यांच्या या जिद्दीने केवळ प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले नाही, तर मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सुमनबाई आजीच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे दिसून आले.